Home Cities पाचोरा पाचोर्‍याच्या व्यापार्‍याची रोकड लंपास

पाचोर्‍याच्या व्यापार्‍याची रोकड लंपास

0
32


पाचोरा प्रतिनिधी । येथील व्यापार्‍याच्या दुचाकीवर लावलेल्या थैलीतून एक लाख पाच हजाराची रोकड लंपास केल्याची घटना संघवी कॉलनीत घडली.

याबाबत वृत्त असे की, संघवी कॉलनी भागात रहिवाशी मुरलीधर नारायण सिनकर याचा जामनेर रोडवरील देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये जोगेश्‍वरी ट्रेडिंग कंपनी म्हणून व्यवसाय आहे. शनिवारी त्यांनी रात्री ८.३० वाजता नेहमी दुकानातून हिशोबाची डायरी व सुमारे एक लाख पाच हजार रूपयांची रोकड बॅगमध्ये टाकून घरी निघाले. ही रक्कम त्यांनी खिशात न ठेवता दुचाकीच्या लावलेल्या थैलीत ठेवली होती. रात्री ८.४५ च्या सुमारास संघवी कॉलनीत घरी पोहचल्यावर मोटरसायकल घरासमोरील लावून घरात जाण्यासाठी दरवाज उघडत असतांना तीन युवकांनी त्यांची थैली हिसकावून घेत पोबारा केला. ही घटना परिसरातील एका सीसीटिव्हीत कैद झाली. मात्र अंधार असल्यामुळे यात गुन्हेगारांचे चेहरे दिसून येत नाहीत. दरम्यान, या घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी भेट दिली असून याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound