Home क्राईम छत्रपती शिवाजीनगर हुडको भागात चोरी; २३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती शिवाजीनगर हुडको भागात चोरी; २३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको भागात राहणाऱ्या एका महिलेचे घर फोडून दहा हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली.

रवीना रमेश सोनवणे या महिला आपल्या कुटुंबासह शिवाजीनगर हुडको येथे राहतात. त्यानुसार, १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून दहा हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रवीना सोनवणे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करत आहेत.


Protected Content

Play sound