अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरुड परिसरातून अज्ञात चोरट्याने वीज मंडळाचे १०० के व्ही च्या रोहित्र खांबाच्या खाली उतरवून फोडून १४ हजार रुपयांची तांब्याची तार चोरून नेली.
अंकुश राजेंद्र शिसोदे यांच्या शेतातून चोरट्याने तांब्याची तार चोरून नेली. याशिवाय चोरट्याने रोहित्रा मधील ऑईल व इतर वस्तूंचे नुकसान केल्याची घटना १३ ते १५ दरम्यान घडली सहाय्यक अभियंता अंकुश राजेंद्र शिसोदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९, ४२७, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत.