Home Cities जळगाव सिंधी कॉलनीच्या युवकांनी मनसेत प्रवेश करून व्यक्त केला निर्धार !

सिंधी कॉलनीच्या युवकांनी मनसेत प्रवेश करून व्यक्त केला निर्धार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुमारे ५५ हून अधिक उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात जंगी प्रवेश केला. शहरात ‘बदल’ घडवण्याची आस आणि स्पष्ट नेतृत्वाची प्रेरणा यामुळे या तरुणांनी मनसेची वाट निवडल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांची थेट, निर्भीड आणि युवकाभिमुख भूमिका तरुणांना प्रभावित करत असल्याचे स्पष्ट चित्र या पक्षप्रवेशावेळी दिसून आले. प्रवेश केलेल्या तरुणांनी शहरातील वाहतूक अनुशासन, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यासारख्या प्रमुख समस्यांवर मनसे घेत असलेल्या भूमिकेचे कौतुक केले.

“बदल हवा तर धाडस हवं, आणि मनसेसोबत उभं राहणं म्हणजे बदलाच्या वाटेला सुरुवात,” असा संदेश देत या तरुणांनी पक्षात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. लक्ष सोनवणे, योगा सोनवणे, कमलेश सोनवणे, कन्हैया राजपाल, विशाल राजपाल, किरण बागल, गौरव कटारिया, दीपक राठोड, साहिल ठाकूर, प्रतीक जोशी यांच्यासह तब्बल ४० हून अधिक तरुणांनी यावेळी प्रवेश केला.

या तरुण प्रवेशामुळे जळगावातील युवकांमध्ये मनसेची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, अविनाश पाटील आणि रज्जाक सय्यद यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound