धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा आंघोळीसाठी पाणी लावत असताना हिटरचा इलेक्ट्रिक शॉक जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुवर्णा गोकुळ पाटील वय -१९, रा. हनुमान नगर, धरणगाव असे मळ्यात झालेल्या तरुणीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील हनुमान नगरात सुवर्णा पाटील ही तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता तिने आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी इलेक्ट्रिक हिटर लावत असताना तिला जोरदार विद्युत शॉक लागला. त्यामुळे तिला तातडीने तिच्या नातेवाईकांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. तरुणीचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत आहे