फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथील चौधरी वाडा येथून तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “चेतन अरविंद चौधरी (वय-३८) रा. चौधरी वाडा, न्हावी ता. यावल हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. दि. ३० जून रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ डीजे ६१८५) ही त्यांच्या घरासमोर पार्कींगला लावून झोपला.
दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १ जुलै रोजी सकाळी उघडकीला आले. त्याने दुचाकी शोध सर्व परिसरात घेतला. परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. मंगळवारी ५ जून रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.” त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन हे करीत आहे.