जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील असावा नगरात तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, सिलींग फॅन आणि ताब्याचे भांडी असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविला. याप्रकरणी शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दिपक विजय पाटील (वय-३३) रा. असावा नगर, पिंप्राळा हा तरूण नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहत आहे. त्यामुळे त्याचे घर १० सप्टेंबरपासून घर कुलूप लावून बंद होते. त्याचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सर्व सामान अस्तव्यस्त करण्यात आला. तर घरातील टीव्ही, चार सिलींग फॅन आणि तांब्याची भांडी असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर तरूण हा परिवारासह गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी घरी आला असता त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरातून सामान चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर दिपक पाटील यांनी शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.