यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चिंचोली गावातील तरूणाने शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १० जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान बळीराम कोळी वय ३५ रा. चिंचोली ता.यावल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
समधान कोळी हा तरूण परिवारासह वास्तव्याला होता. त्याने चिंचोली गावातील दिपक बडगुजर यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांना बोलावण्यात आले. मयताची ओळख पटविण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहीरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ वासूदेव मराठे हे करीत आहे.