कुसुंबा येथील तरूणाने घेतला गळफास; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधान आत्माराम पाटील (वय-३५) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाने नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान पाटील हा मुळ रहिवाशी बोदर्डे ता. पारोळा येथील राहिवाशी आहे. गेल्या १७ वर्षांपासून कुसुंबा येथे राहतो. चटई कंपनीत काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणातून मानसिक तणावात होता. आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. सायंकाळी ५ वाजता आई सुनंदाबाई घरी आल्या तेव्हा हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील नातेवाईकांनी तातडीने मृतदेह उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, भाऊ जितेंद्र, पत्नी, मुलगा समर्थ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. 

 

Protected Content