शेतात ठिंबक नळीने तरूणाने केलं अस काही !… दोन्ही भावांनी फोडला टाहो

दोन वेळा तुटली ‍ठिंबक नळी, तिसऱ्या वेळी बसला फास

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणाने ठिंबक नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २४ जुलै रोजी उघडकीला आली आहे. गळफास घेतांना दोन वेळा तुटली ‍ठिंबक नळी, तिसऱ्या वेळी बसला फास असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सुरेश पुन्या मुजालदे (पावरा, वय -२५) रा. बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. वडनगरी ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी गावातील सुरेश मुजालदे हा तरूण आपल्या इतर दोन भावांसह जळगाव तालुक्यातील वडनगरी गावात वास्तव्याला होता. शेतीसह इतर मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सुरेश हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी युवराज मंगा सोनवणे यांच्या शेतातील झाडाला ठिंबक नळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान शेतकरी युवराज सोनवणे हे शेतात गेल्यानंतर त्यांना वास आला त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असलेल्या ओळख पटविणे अवघड होते. यावेळी गावातील नागरीक आणि मयताचे भाऊ घटनास्थळी दाखल झाले. जवळच असलेल्या चप्पलवरून मयत हा सुरेश मुजालदे असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला . या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.

Protected Content