अमळनेर (प्रतिनिधी) साधी राहणी ,आणि उच्च विचारसरणीचे संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय,आणि सुधारणा व स्वच्छता यामध्ये जास्त रुची होती. त्यांचे कार्य संपूर्ण बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. ते अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय व डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शासकीय प्रतिमा वाटप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
व्यासपीठावर साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यां उपाध्यक्षा प्राध्यापक डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,विश्वस्त बापू नगावकर ,परीट समाजाचे अध्यक्ष अमृत जाधव, जितेंद्र महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले तर माल्यार्पण विश्वस्त बापू नगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजन दीपक वाल्हे यांनी केले.
कार्यक्रमात पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक माधुरी भांडारकर, संचालक भीमराव जाधव यांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेचा मूलमंत्र या विषयावर सविस्तर माहिती देऊन गाडगेबाबांची साधी राहणी व उच्च विचारसरणी मानवाने अंगीकारली तर त्याचे भावी जीवन उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. संत गाडगेबाबांचे विचारच देशाला विकासाकडे नेतील असे सांगितले. व कार्यक्रमाचे आयोजक दीपक वाल्हे यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमा भेट म्हणून दिली हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ,त्यांच्या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात व त्यांना त्यांच्या कामाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
वाचनालयाच्या वतीने शासकीय प्रतिमा वाटप
डेबुजी झिंगराजी जानवेकर ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्यावतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून अमळनेर शहरातील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आंमळनेर,र.का केले ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर,साईबाबा ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर, ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर ,आदरा ए स्टार वाडी चौक अमळनेर या पाच ग्रंथालय व मोफत वाचनालय यांना संत गाडगेबाबा यांची शासकीय प्रतिमा व गाडगेबाबा यांचे पुस्तक भेट म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. कार्यक्रमास सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक पी. एन बादलीकर,अँड रामकृष्ण उपासनी, ईश्वर महाजन,प्रसाद जोशी ,संयक्त चिटणीस सुमित धाडकर, गोरख चित्ते, रवी जाधव ,मोतीलाल जाधव ,गंगाराम वाल्हे,अनिल मांडोळे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डेबुजी झिंगराजी जानोरकर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक वाल्हे यांनी केले.