कासोदा ता.एरंडोल (राहुल मराठे) येथील वाल्मिक शिवदास गढरी यांच्या पारोळा रस्त्यालगतच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांनी एका महिलेला हे विहिर खोदण्याचे काम दिले आहे. सदर महिला स्वतः क्रेन ऑपरेट करून इतर चार मजुरांचे पोट भरत आहे.
ही महिला विहिर खोदण्यासाठी महिला सज्ज झाली असुन ४५ फुट खोल विहिर आतापर्यंत झालेली आहे. त्या महिलेचे नाव कांताबाई बाळू शिंदे (वय ३२) असून त्या सोनबर्डी ता.एरंडोल येथील रहिवासी आहेत. सध्या वरूण राजाने पाठ फिरवल्यामुळे शासनाने एरंडोल तालुका दुष्काळ जाहीर केला आहे, दुष्काळी परिस्थितीत काम मिळणे कठीण झाल्याने यांना पोट भरण्यासाठी हे अवघड काम करावे लागत आहे. आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे काम पत्करल्याचे त्यांनी म्हटले आहे.