महिलेचा मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा आठवडे बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेल्या सुशिल सुभाष सोनार (वय ४६, रा. तलाठी ऑफिसजवळ) यांचा मोबाईल चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील तलाठी ऑफिसजवळ सुशिल सोनार हे वास्तव्यास आहे. दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ते आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते. बाजार करीत असतांना चोरट्याने त्यांच्या खिशातून १७ हजार ९०० रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना उघडकीस येताच, सोनार यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. मात्र तरी देखील मोबाईल मिळून न आल्याने अखेर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड हे करीत आहे.

Protected Content