Home क्राईम चाळीसगाव शहरात महिलेची मंगलपोत लांबविली

चाळीसगाव शहरात महिलेची मंगलपोत लांबविली


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील बामोशी बाबा दर्गाजवळ राहत्या घरातून महिलेची ३५ हजार रूपये किंमतीचा मंगलपोत चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, भारती शरद अंतुरेकर (वय-४४) रा. कलेक्टर पट्टा मालेगाव जि. नाशिक हे कामाच्या निमित्ताने चाळीसगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. दरम्यान १९ ऑगस्ट सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची  मंगलपोत चोरीस गेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता मिळाली नाही. मंगलपोत अज्ञात चोरट्यांने चोरी केल्याचे समोर आले. याप्रकरणी महिलेने चाळीसगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुभाष घोडेस्वार करीत आहे. 

 


Protected Content

Play sound