भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पुरूषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंट येथील महिलेचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ मे रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुजाता श्रीकांत मंत्री वय-५५ रा. चैतन्य अपार्टमेंट, पुरूषोत्तम नगर, भुसावळ या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ३ मे रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी महिलेचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुपारी २ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासीन सत्तार हे करीत आहे.