जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध कृषी विषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार 10 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित राहतील. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री भुसे यांनी केली आहे.
कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे कृषी विभागाचे यू-ट्यूब चॅनेल http://(http://www.youtube.com/c/Agriculture DepartmentGoM) वर लाइव प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे ग्रामपातळीवरील कृषी विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषी विकासावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.