वरणगाव दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर वासीयांचा रहदारीचा रस्ता वेल्हाळे रोड येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या पुलाखाली कायमस्वरूपी साचणारे पाण्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत रोज करावी लागत होता. साचत असलेल्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी तत्कालीन नगरसेविका माला मेढे यांच्याप्रयत्नाने गटारीच्या कामाला मंजूरी मिळाली असून उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिंध्देश्वर नगर वासीयांचा रहदारीचा रस्ता वेल्हाळेरोड येथील रेल्वे भुयारी मार्गाचा पुलाखाटील नेहमी पावसामुळे पाणी तुंबले जाते. दरम्यान यामुळे नागरीकांची ये जा होतांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान प्रभाग क्र. 17 च्या तात्कालीन नगरसेविका मालाताई मिलिंद मेढे यांनी अथक परिश्रम करून दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 54 लक्ष रुपयाची एक गटार नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर केली आहे. त्या गटारीचे काम उद्या पासून सुरू करण्यात येणार आहे पण पुलाखाली साचणाऱ्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी यासाठी रेल्वेचे अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या सोबत चर्चा केली.
यावेळी वरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे, प्रभाग क्रमांक. 17 चे माजी नगरसेविका सौ. मालाताई मेढे व कामगार नेते मिलिंददादा मेढे यांनी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावून लवकरात लवकर पुलाखाली सचणाऱ्या पाण्याच्या योग्यप्रकारे निचरा करून ते मार्गी लावावे व योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा असे बजावले. या पुलाचे काम नगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते मिलिंद मेंढे यांनी दिली आहे