Home क्राईम रस्त्यावरील खड्डयाने घेतला तरूणाचा बळी

रस्त्यावरील खड्डयाने घेतला तरूणाचा बळी


bhadagaon accicdent

भडगाव प्रतिनिधी । दुचाकीने भडगाववरून बोरणार येथे जात असतांना रस्त्यात आलेल्या खड्डयात दुचाकी पडून घसरल्याने तालुक्यातील बोरणार येथील 26 वर्षीय तरूणाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली असून याबाबत भडगाव पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेश भीमराव महाजन (वय-26) बोरणार ता. भडगाव हो 5 एप्रिल बोरणार येथून कजगावकडे प्लेटिना मोटरसायकल नंबर (एमएच 19 एव्ही 2689) या गाडीवर जात असताना प्रकाश सोनू पवार यांच्या शेताजवळ रोडलगत खड्ड्यात मोटरसायकल आदळल्याने जागीच पडल्याने रोडवरील दगडाचा जबर मार लागून डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वडगाव येथे हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहिरे यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. भडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग सोनवणे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound