हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व : आ. किशोरआप्पा पाटील

616eff50 9c3b 4a63 a0e2 9f02a9197ab2

पाचोरा (प्रतिनिधी) मुस्लिम समाज बांधवांसाठी हजयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मक्का मदीना अल्लाचे पवित्र ठिकाण आहे. आपण मक्का मदीनालाला जाऊन अल्लाचे दर्शन घ्या व आपल्या गावासाठी, राज्यासाठी, देशासाठी परमेश्वराला देशात सुख, शांती, समृद्धी नांदो, अशी प्रार्थना करावी, असे प्रतिपादन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी नुकतेच केले. ते तालुक्यातील पवित्र हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

 

यावेळी महेबूब करामन बागवान (रा. संभाजीनगर, पाचोरा), शेख इसाक शेख, वजीर मन्यार शेख रज्जाक शेख अब्दुल रहमान मन्यार (रा. सातगाव डोंगरी), शेख रफिक मुसा (रा. नुरानी नगर पाचोरा), शहीद रफिक साहब (रा. नुरानी नगर) आदींचा शाल पुष्पहार घालून दिनांक सोमवारी सकाळी 11:00 वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी हज यात्रेकरूंना शुभेच्छा देताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, हज यात्रेला जाणाऱ्या परमेश्वर तुमचे प्रार्थना नक्कीच ऐकतील. आपण सारे हिंदू- मुस्लिम बांधव अंत्यत गुण्यागोविंदाने एकोप्याने राहत आहेत. हजयात्रा सुखाची समाधानाची होवो. आपले आरोग्य निरोगी राहो. आपल्या हातातून देशाची सेवा घडो,असे मनोगत आ. पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी मौलाना अमजद खान यांनी हजयात्रेचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. यावेळी रावसाहेब पाटील, गणेश पाटील, दिनकर देवरे, उद्धव मराठे, शरद पाटील, अविनाश कुडे, रहमान तडवी, गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या महाजन, किशोर बारावकर, मतीन बागवान, भरत खंडेलवाल, शाकीर बागवान, इसा खान, जावेद शेख, अब्दुल गणी, आरिफ भाई, ठेकेदार सिकंदर तडवी, वसीम शेख इमाम शेख, निसार पिंजारी, अन्वर टाकारी, अखिल मिर्झा, दिनकर गीते, संदीप राजे, भैय्या देवरे, दत्तू कुमावत, कैलास पाटील, मधु बारी, अनिकेत सुर्यवंशी, अण्णा चौधरी,निखिल भोई, मयूर महाजन, बापू सोनवणे,दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभ यशस्वीतेसाठी मतीन बागवान शाकिर बागवान, जावेद शेख तथा अल्पसंख्यांक आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Protected Content