भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एका 58 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार 17 जून रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे. या प्रकरणी सायंकाळी 5 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. संजय पुरुषोत्तम भावसार वय-58 रा. जुना सातारा बागवान गल्ली भुसावळ असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे खंबा क्रमांक 442 जवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने संजय भावसार यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 17 जून रोजी दुपारी 2 वाजता घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान कागदपत्राचे आधारे मयताची ओळख पटली. मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानुसार या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.