धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्थानक जवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१९ जवळ एका धावत्या रेल्वेखाली आल्याने अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ राजू निकम हे करीत आहे.

Protected Content