Home क्राईम विशाल कॉलनीतून दुचाकी लांबविली

विशाल कॉलनीतून दुचाकी लांबविली


जळगाव प्रतिनिधी । विशाल कॉलनीतून १५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, किशोर दामोदर मुंदडा (वय-६१) रा. विशाल कॉलनी नवसाचा गणपती जवळ हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा मोठा मुलगा हेमंत यांच्याकडे २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दुचाकी (एमएच १९ एक्यू ४१५२) क्रमांकाची दुचाकी घेवून गेले. दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात किशोर मुदंडा यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहे. 


Protected Content

Play sound