दोघांनी तरूणीला दुचाकीवरून पळविले

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील यावल तालुक्यातील एका गावातील  १८ वर्षीय तरूणीला दोन जणांनी दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील  १८ वर्षीय ही तरूणी आपली  आई व लहान बहिणीसोबत वास्तव्याला आहे. आई मजूरी करून दोन्ही मुलींचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी २८ मार्च रोजी आई ह्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन्ही मुली घरीच होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तरूणीला गावातील अरविंद वसंत भील आणि प्रकाश रामधन भील यांनी दुचाकीवर बसून पळवून नेले. तरूणीला दोघांनी बसवून नेल्याचे तरूणीच्या मामांनी पाहिले व तत्काळ बहिणीला हा प्रकार सांगितला. तरूणीच्या आईने शोधाशोध केली यात दोन्ही मुले देखील रात्री उशीरापर्यंत घरी आलेले नव्हते. याप्रकरणी तरूणीच्या आईने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content