यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल तालुका हा बहुल आदिवासी क्षेत्र म्हणुन जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याच्या एसटी महामंडळाच्या बस आगाराला आदिवासी क्षेत्राकरीता चालविण्यात येणारी मानव विकास विभागाच्या मागणीला मिळणारी एसटी बस अद्यापपर्यंत महामंडळाकडून यावलच्या एसटी बस आगारास मिळालेली नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सातपुडा पर्वताच्याये पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यात एकुण ८६ गावे समाविष्ट असुन यातील अर्धापेक्षा अधिक गाव ही आदिवासी बहुल वस्ती व पाडे असलेली गावे असुन, सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेला हा भाग पुर्णपणे जंगलाने व्यापला गेला आहे. यावल एसटी बस आगाराच्या बसस्थानकास स्थापने पासुन आजपर्यंत १०० टक्के आदीवासी परिसर असल्यावर देखील मानव विकास ची ही एसटी बस सेवा का मिळत नाही. या संदर्भात मानव विकास आयुक्त कार्यालयाने तात्काळ यावल आगाराला मानव विकास विभागाच्या मागणीला मिळणारी ही विशेष एसटी बस सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी परिसरातील असंख्य आदिवासी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.
राज्य शासन व परिवहन महामंडळ आदिवासी बांधवांना सूविधा देण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करीत आहे. असे असतांना या उलट शेजारच्या रावेर आणी चोपडा दोघ एसटी आगाराला मानव विकास विभागाच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी अशा प्रकारच्या बससेवा देण्यात आलेल्या आहे. या मानव विकास विभागाव्दारे देण्यात आलेल्या एसटी बससेवेमुळे आदिवासी बांधवांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शहरी भागात यावे लागते याशिवाय आदिवासी बांधवांना या बस सेवेमुळे शहरी क्षेत्राशी दळणवळणाचे सुरक्षीत साधन म्हणुन जोडण्यासाठी महत्वाचा फायदा मिळणार असुन शिवाय यावलच्या एसटी बस आगारात ६० पैकी ४८ बसेस या नादुरूस्त असुन, प्रवाशी वाहतुकीसाठी धोकादायक आहे. तरी मानव विकास विभागाने या आदिवासी बहुल क्षेत्रासाठी या विशेष बससेवा आगारास द्यावी अशी मागणी शेकडो आदिवासी बांधवांकडून होत आहे.