
वरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या फेकरी पुलाखालील रेल्वे रुळालगत एक उभे झाड जळत असल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी निदर्शनास आला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ.नी.तू.पाटील यांनी या प्रकारची भुसावळ रेल्वे ट्राफिक रूमला फोन करून माहिती दिली होती. तसेच थेट रेल्वे मंत्रालयाला ट्वीट देखील केले होते. या प्रकारची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दुपारी हे झाड कापले आहे.
या संदर्भात अधिक असे की, फेकरी पुलाखाली रेल्वे मार्गाजवळ आज सकाळी एक झाड जळत असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉ.नी.तू.पाटील यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत भुसावळ रेल्वे ट्राफिक रूमला फोन करून माहिती दिली होती. तसेच थेट रेल्वे मंत्रालयाला ट्वीट केले. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने दुपारी हे झाड तोडले. दरम्यान, या झाडाचा खालील भाग ठीक होता. फक्त फांद्या जळत होत्या. त्यामुळे काळ रात्री वीज पडल्यामुळे झाडणे पेट घेतला असावा,असा अंदाज आहे. या संदर्भात डॉ.नी.तू.पाटील यांनी दाखवलेल्या कार्यतत्पर्तेमुळे वेळीच प्रशासन कार्यरत झाले आणि पुढील अनर्थ टळला.
