पाचोरा प्रतिनिधी । नवरात्रोत्सवानिमित्त पाचोरा येथील शितल आर्टच्या मार्गदर्शिका तथा संचालिका शीतल पाटील आणि त्यांचे सहकारी स्नेहल जैन, प्रांजल जैन, निकिता मराठे, अनुष्का पाटील, योगिता पाटील, अश्विनी पाटील, अमृता पाटील यांनी डोळ्यांचे पारणे फिटेल अशी देवीची रांगोळी साकारली आहे.
“भारतीय उत्सव परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारे अनेक उत्सव ही परंपरा जपतांना साजरे केले जातात. अशाच प्रकारच्या धार्मिक वारसा आणि भक्ति भावना मनात जागरूक ठेवणारा उत्सव म्हणजे नवरात्री, नऊ दिवस देवीची पूजा करून आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा येथील “शितल आर्ट क्लासेस” हे आहे. शितल आर्टच्या माध्यमातून नेहमीच उत्कृष्ट अशा कलाकृतींचे दर्शन शहरासह परिसरातील नागरिकांना बघावयास मिळत असते. सद्यस्थितीत सर्वत्र नवरात्रीची धुम धाम असुन नवरात्रीनिमित्त पाचोरा येथील शितल आर्टच्या मार्गदर्शिका तथा संचालिका शीतल निशिकांत पाटील आणि त्यांचे सहकारी कु. स्नेहल जैन, कु. प्रांजल जैन, कु. निकिता मराठे, कु. अनुष्का पाटील, योगिता पाटील, अश्विनी पाटील, अमृता पाटील यांनी नवरात्री उत्सवानिमित्त डोळ्यांचे पारणे फिटेल अशी देवीची रांगोळी साकारली आहे.
ही रांगोळी साकारण्यासाठी शितल पाटील व त्यांच्या महिला सहकाऱ्यांना तब्बल २५ तासाचा वेळ लागला असुन लेक व पिग्मेण्ट रंगाचा वापर या कलाकृतीला साकारण्यासाठी करण्यात आला आहे. यासाठी त्यांना ९ किलो रांगोळी लागली असुन शहरासह परिसरातील भाविक भक्तांसाठी या अतुलनीय रांगोळी बघण्यासाठी दि. ८ ऑक्टोबर पासून दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत ही अनोखी कलाकृती शहरातील नवकार प्लाझा येथील गाळा क्रं. ५७ येथे निःशुल्क बघावयास मिळणार आहे. या कलाकृतीचे दर्शन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शितल आर्टच्या संचालिका शितल पाटील सह त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी केले आहे. तसेच शितल पाटील व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी साकारलेल्या या अद्भभुत कलेचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.