जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर परिसरात ट्रॅक्टर भरदा वेगाने चालवत असताना थांबवण्याचे सांगितल्याचा राग आल्याने ट्रॅक्टर चालकाने एका वकिलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी १४ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. याप्रकरणी शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी केदार किशोर भुसारी (वय-४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वकिली करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवार १४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घराजवळून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ७७४४) वरील ट्रॅक्टर चालक प्रवीण ज्ञानेश्वर ठाकरे वय-३१, रा.दिनकर नगर, जळगाव हा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवीत होता, त्यावेळी भुसारी यांनी थांबवले. असता याचा राग आला आणि त्याने केदार भुसारी यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत वकील केदार भुसारी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक प्रवीण ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे