जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवा सेना जळगावच्या वतीने यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘निष्ठा दहीहंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ऑगस्ट रोजी शहरातील मनपा इमारतीजवळ ही दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून, या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमित जगताप यांची तर सचिवपदी गजेंद्र कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा सेनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या उत्सव समितीमध्ये अमित जगताप (अध्यक्ष) आणि गजेंद्र कोळी (सचिव) यांच्यासोबत अंकित कासार (उपाध्यक्ष), राहुल शिंदे (सहसचिव), हर्षल मुंडे (कोषाध्यक्ष) आणि सौरभ चौधरी (प्रसिद्धी प्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या दहीहंडी उत्सवासाठी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महेश ठाकूर, यश सपकाळे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच, निलेश जोशी, रोहन सपकाळे, निशिकांत पाटील, प्रवीण चौधरी, देव सपकाळे, दिपाली बाविस्कर, किरण सपकाळ, दीक्षा जैन आदींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा सेनेच्या या ‘निष्ठा दहीहंडी’ साठीची उत्सव समिती शिवसेना लोकसभा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आणि युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या सर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य या दहीहंडी उत्सवाला लाभत आहे.



