यावल शहरवासीयांची “तहान” भागणार; अमोल जावळेंचा पाठपुरावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा व्यास नगरी या सुमारे ६o हजाराच्या वर लोकवस्ती असलेल्या यावल या शहरातील शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर असा प्रलंबित प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर काल शेवटच्या मुंबई येथे मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मार्गी लागला.

ऐतिहासिक वैभव लाभलेल्या यावलला सततची असणारी पाणीटंचाई आणि अपूर्ण पद्धतीचा होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय दूर करण्याची नागरिकांची मागणी ही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे जिल्ह्याचे जेष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून दूर केली आहे.

पक्षाने दिलेल्या पदाची धुरा त्यांनी अतिश्य चांगल्या पद्धतीने सांभाळल्या पासून मागील दोन वर्षापासुन भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे हे पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

Protected Content