पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फर्ग्युसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून चोरट्यांनी आठ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्री तुकाराम महाराज पादुका मंदिराचे विश्वस्त रमेश प्रतापराव शिरोळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्री तुकाराम महाराज मंदिराचा दरवाजच्याचे कुलूप चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उटकटून चोरट्यांनी आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. रविवारी सकाळी मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.