जळगाव प्रतिनिधी । बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील दोन लाखांची रोकड आणि 79 हजारांचे दागिने चोरीला नेल्याची घटना आज मध्यरात्री 2 ते 4 वाजेच्या दरम्यान रामानंद नगर हद्दीतील समता नगरात घडली असून ही घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारार उघडकी आली आहे. याबाबत रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, समता नगरात राहणारे ट्रकचे काम करणारे भागवत ओंकार अहिर आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मालधक्क्यावर ट्रक लावण्याचे काम करतात. त्यांनी ट्रकचे चार टायर बदलविण्यासाठी आणि ट्रकचा विमा भरण्यासाठी दोन लाख रूपयांची रोकड आणि मुलींच्या लग्नात घेतलेले दागीने घरातील लोखंडी कपाटात ठेवून 25 रोजी सकाळी 11 वाजता कुटुंबियांसोबत बुलढाणा येथील सैलानी बाबा यांच्या दर्शनासाठी घराला कुलूप लावून निघाले. दरम्यान मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत बंद घर फोडून कपाटात ठेवलेले रोकड आणि 85 हजाराचे दागीने चोरून नेले. चोरून नेत असतांना अज्ञान चोरट्यांनी मधल्या घराचे दारवाजे अलगद लावलेले होते. आणि बाहेरच्या दरवाजाला तोडलेले कुलुप लावून पसार झाले होते.
रामानंद नगर पोलीसांची धाव
सकाळी भागवत अहिरे आपल्या कुटुंबियांसोबत बाबाचे दर्शन घेवून पहाटे तीन वाजता घराकडे निघाले. घरी आल्यावर त्यांना तोडलेले कुलूप दिसून येतात त्यांनी कपाटाकडे धाव घेतली. बघतो तर त्यांनी कपाटात ठेवलेले दोन लाख रूपयांची रोकड आणि 85 हजार रूपयांचे दागीने चोरून नेल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलीसांशी संपर्क करून चोरी झाल्याचा प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी निलाभ रोहन आणि रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप बुधवंत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.