पाण्याची मोटार चोरून नेणाऱ्या चोरट्याला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कला भवन जवळ परिसरात घराच्या कम्पाऊंडच्या आवारातून ६ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ओमप्रकाश रामपाल मणियार वय ५१ रा. लेक अपार्टमेंट, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे भावाचे कला भवन जवळ घर आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या भावाच्या घराच्या कंम्पाऊंड मधून ६ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेत असतांना संशयित आरोपी शोएब शेख नासीर शेख रा. बिलाल चौक, जळगाव हा आढळून आला. यावेळी चोरट्याला ओमप्रकाश मणियार यांनी रंगेहात पकडले. त्याला जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना उघडकीला आल्यानंतर ओमप्रकाश मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शोएब शेख नासीर शेख रा. बिलाल चौक, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख हे करीत आहे.

Protected Content