तरूणाच्या खिश्यातून रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जी.एम.फाऊंडेशन कार्यालयात एका तरूणाच्या खिश्यातून २७ हजारांची रोकडची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केल्याची घटना ४ जून रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनश्याम चुडामण पाटील वय ४० रा. खडके खुर्द ता. एरंडोल जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ जून रोजी दुपारी ५ वाजता ते धनश्याम पाटील हे जळगाव शहरातील जी.एम. फाऊंडेशन येथे असलेले होते. त्यांवेळी संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख वय ३० रा. गौसिया नगर भुसावळ याने धनश्याम पाटील यांच्या खिश्यातून २७ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर धनश्याम पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून सायंकाळी ५ वाजता तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख याला अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी हे करीत आहे.

Protected Content