विहिरीतील ईलेक्ट्रीक मोटारीची केबल वायरची चोरी !

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील शेतातून विहिरीतील ईलेक्ट्रीक मोटारची केबल वायर चोरून नेल्याची घटना गुरूवार १३ जून रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दिनेश भैय्यालाल जामुनकर वय ३६ रा. केलपाणी ता. अकोट जि. आकोला असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र दिवाकर भोळे रा. साकेगाव ता. भुसावळ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे साकेगाव शिवारात शेत आहे. या शेतातील विहिरीत ईलेक्ट्रीक मोटार बसविण्यात आले आहे. दरम्यान गुरूवार १३ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दिनेश जामुनकर याने इलेक्ट्रीक मोटारची ४५ फूट लांबीची केबल वायर चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर शेतकरी राजेंद्र भोळे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिनेश जामुनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे हे करीत आहे.

Protected Content