जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ई-सेक्टरमधील पॅराडाईज कंझूमर प्रॉडक्ट कंपनीतून कॉपर वायर आणि जुने मशिनरी पार्ट असा एकूण ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी मधील ई सेक्टरमध्ये पॅराडाईज कंझूमर प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत कॉपर वायरचे काम केले जाते. दरम्यान 25 डिसेंबर ते 27 डिसेंबरच्या दरम्यान या कंपनीच्या आवारात असलेले 7 हजार रुपये किमतीचे कॉपर वायर आणि जुने मशिनरी पार्ट अज्ञात अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समोर आली. या संदर्भात शनिवारी 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता कंपनीत काम करणारे अमित रुद्रदत्त मिश्रा यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्यादी त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.