
जळगाव-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद गावातील पंढरपूर नगरात एका तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र, रोकड आणि मोबाईल असा एकूण २५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती सोपान मुतरकर वय ३१, रा. मलकापूर जि. बुलढाणा ह.मु. पंढरपूर नगर, नशिराबाद हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो ११ जुलै ते १४ जुलै दरम्यान त्याचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र १० हजारांची रोकड आणि मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मध्यभाग चोरून नेला ही घटना १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता समोर आले या प्रकरणी निवृत्ती मोतरकर यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली त्यानुसार सोमवारी १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रवींद्र तायडे हे करीत आहे.



