बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बुलढाणा जिल्हयात शेळयाची चोरांसाठी आलिशान कारचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जिल्हयातील मोताळा तालुक्यात कोथळी गावात घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार वृत्त असे की, कोथळी या गावातून तीन व्यक्ती शेळ्यांची चोरी करून पळून जात होते. हा प्रकार गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर शेळ्यांची चोरी करून पळून जाणाऱ्या या तिघांना गावातील जमावाने पकडून जाब विचारला. त्यानंतर मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला आणि त्यानंतर संतप्त जमावाने तिंघाना मारहाण केली. तसेच त्यांच्या कारचीही तोडफोड करत मोठे नुकसानही केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले आणि या प्रकरणी बोरखेडी पोलिसांनी सुरज हिवराळे , रविकांत हिवराळे आणि आशिष वानखेडे या तिघांना अटक केली आहे. आपल्या ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र या हटके चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.