पत्नी व मुलावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी बुद्रुक गावात पतीने धारदार शास्त्राने पत्नीवर आणि मुलावर वार करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. घटना घडल्यापासून फरार पतीला एमआयडीसी पेालिसांनी गुप्त माहितीच्या अधारे धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथून अटक केली आहे.

जळगाव शहरालगत खेडी गावात माधुरी समाधान सपकाळे (वय-३५) या विवाहिता मुलगा ऋुषभ, व लहान मुलगा विकी याच्यासह वास्तव्याला आहेत. पती समाधान सपकाळे ऊर्फ उत्तम याच्या व्यसनाधिनतेला कंटाळून देाघा पोरांचा संभाळ करण्यासाठी खेडी येथे नातेवाईकाकडे स्वंतत्र राहत आहेत. अशातच ७ नोहेंबर रेाजी मध्यरात्री पती समाधान सपकाळे त्यांच्या घरी आला. सेाबत चालण्यास पत्नीने नकार दिल्यावरुन देाघांत वाद होवुन कडाक्याचे भांडण झाले. समाधान सपकाळे याने माधुरी यांच्या डोक्यात हातापार्यांवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. आईला मारहाण होत असल्याने मुलाने बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला हेाता. या हल्ल्यात माधुरी यांना गंभीर दुखापती होवुन तब्बल ९१ टाक्यांची शस्त्रक्रिया करुन त्यांचा जिव वाचवण्यात जिल्‍हारुग्णालयास यश आले.

हल्ल्यात पत्नी माधुरीचा मृत्यू झाल्याचे समजुन समाधान सपकाळे उऊर्फ उत्तम याने तिला सोडून पळ काढला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसा पासुन समाधान तसाच इकडून तिकडे भटकंती करत होता. रविवारी १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता एरंडोल येथून निघाला, तेथून मुंबई जाणार असल्याची गुप्त माहिती डिवायएसपी संदिप गावीत यांना मिळाली. निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील उपनिरीक्षक शरद बागल, योगेश बारी, किशोर पाटिल, छगन तायडे, नितीन ठाकुर, नरेंद्र मोरे अशांच्या पथकाने संशयीताचा पाठलाग करत धरणगाव तालूक्यातील मुसळी फाट्या जवळ शेतातून ताब्यात घेतले.

Protected Content