चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या जेष्ठ नगरसेविका सौ. रंजनाताई सोनवणे व कळमडू येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक यशवंतराव भगा सोनवणे यांचे सुपुत्र अंधशाळेचे शिक्षक सचिन व सुन सौ. यांच्या धुळे रोडवरील कृष्णा वर्ल्ड सिटीमधील नव्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाची पञिका न छापता फक्त व्हाट्सअॅपच्या माध्यमातून सुमारे ९०० लोकांना आमंञण देण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ८६४ लोकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.
आजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण मोकळं जगणं अवघड झालेलं असतांना घरोघरी वा प्रत्यक्ष जाऊन अथवा पोस्टाने पञिकावाटप करण्याची प्रथा डिजीटल युगात हद्दपार झालेली असतांनाही काही आप्तस्वकीय व मिञपरिवार घरी येऊनच पञिका दिली तरच कार्यक्रमास हजेरी लावू, असा हट्ट धरून असतात. माञ डिजीटल युगात प्रत्येकाकडे फेसबुक व व्हाट्सअॅप हे सोशल मीडिया साधन असल्यानेच पञिका न छापण्याचा आग्रह सचिन यांच्यासह त्यांचे बंधू रोटरी मिलेनियम अध्यक्ष डॉ. प्रमोद व सुहास सोनवणे यांनी धरला.
व्हाट्सअॅपच्या माध्यमातून निमंञणाचा ९०० लोकांना मेसेज पाठवून उपस्थितीचे आवाहन केल्यावर तब्बल ८६४ लोकांनी कार्यक्रमास हजेरी लावून सोशल
मीडियाची मेसेजरूपी पञिकेला स्वीकृती दिली. समाजात जास्तीतजास्त लोकांनी जर डिजीटल पत्रिकांचा स्विकार करण्याची मानसिकता अंगिकारल्यास पञिका वाटपासाठी होणारा वाहनइंधनाचा व पञिका छपाईचा खर्च वाचेल. त्यामुळे एकप्रकारे पर्यावरणाचे संवर्धन होईल. प्रवासात अपघाताची शक्यता कमी होईल, असे मत डॉ. प्रमोद सोनवणे यांनी यासंदर्भात व्यक्त केले.