जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदाम गल्ली, विठ्ठल पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेची सांगता गुरुवार २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात झाली. सायकांळी भव्य अशी पालखी दिंडी काढण्यात येऊन सोहळ्यात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी महिलांनी डोक्यावर तुळशीचे कळस घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच वारकरी संप्रदायातील लहान मुले सहभागी झाले होते. सांगता समारोपाच्या दिवशी सुरुवातीला काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, ज्यात दहीहंडी फोडून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

शिवमहापुराण कथा या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात बुधवार १४ जानेवारी रोजी झाली असून, सांगता गुरुवार २२ जानेवारी रोजी झाली. या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत काकडा आरती, दुपारी १ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा तर संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १०.३० वाजेपर्यंत राज्यातील विविध कीर्तनकारांनी किर्तन केले. या कार्यक्रमांनंतर, गुरुवारी २१ जानेवारी रोजी दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि संध्याकाळी ६ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाप्रसादाचा १ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या कथेसाठी श्रीश्रीहरिहरानंद भारतीस्वामीजी (श्रीमठ महादुर्ग किल्लेधारूर, ता. धारूर, जि. बीड) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सात दिवस शिव शंकराची महिमा कथन केली. भगवान महादेवाचा महिमा त्यांनी सात दिवस भगवान महादेवाचा महिमा विविध प्रसंग सांगून व मार्गदर्शन करून कथन केला. तर दररोज रात्री विविध कीर्तनकारांनी महाराष्ट्रातील संतांची परंपरा आणि त्यांचे विचार सांगून प्रबोधन केले. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.



