जळगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद नगर परिसरात बंद घरातून चोरीला गेलेले चांदीचे व सोन्याचे दागिने सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते मुद्देमाल फिर्यादी डॉ. प्रभाकर विडेकर यांना परत आज देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील विवेकांनद नगर परिसरात राहणारे डॉ. प्रभाकर अमृतराव विडेकर यांच्या बंद घरातून २१ डिसेंबर २००८ रोजी अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून ७०० रूपये किंमतीचे चांदीचे लगड, सोन्याचे मंगळसूत्र, सोनी आणि कोडॅक कंपनीचे दोन कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या कडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेला मुद्देमाला पोलीसांन जप्त केल्यानंतर फिर्यादी डॉ. प्रभाकर विडेकर यांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बोलावून सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्याहस्ते चोरीस गेलेला मुद्देमाल कोर्टाच्या आदेशाने देण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आदी उपस्थित होते.