यावल, प्रतिनिधी | येथील एसटी महामंडळाच्या आगाराच्या नियंत्रण कक्षात गेल्या एक महिन्यापासून प्रवासी सवलतीसाठी स्मार्ट कार्ड नोंदणी अभियान राबविले जात आहे. त्यात सुमारे १२०० नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.
यावलच्या एसटी आगारातुन सुरु करण्यात आलेल्या नावनोंदणी कक्षात आगाराच्या वाहतुक नियंत्रक मिना नामदार तडवी यांच्याकडे प्रभारी आगारप्रमुख एस.व्ही. भालेराव यांनी जेष्ठ नागरिक प्रवासी सवलत नावनोंदणीची जबाबदारी सोपवली आहे. आगाराच्या माध्यमातुन प्रतिदिन ४० जेष्ठ नागरिकांच्या नावाची नोंदणी करण्यात येत असुन आतापर्यंत सुमारे बाराशे जेष्ठ नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी केली आहे. या स्मार्ट कार्ड नाव नोंदणी करीता इच्छुकांकडून आधार कार्डाची प्रत, एक पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक घेण्यात येवून ५० रुपये फी आकारण्यात येत आहे. अशी माहिती आगाराच्या वाहतुक नियंत्रक मिना तडवी यांनी दिली आहे.