गंगटोक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईशान्येकडील राज्य अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येणार आहे. या दोन्ही राज्यातील मतमोजणीही सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार, हे आज स्पष्ट होईल. १९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. राज्याच्या 32 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी सर्व 32 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
भाजपचे 31 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काही जागांवर आणि नवे पक्ष सीएपी-एसच्या 30 जागांसह मैदानात आहे. तर काँग्रेसने 12 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चेची लढत सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटसह आहे. सत्ताधारी पक्ष सलग दुसऱ्यांदा विजेची अपेक्षा करीत आहे. सिक्कीम मधील ३० जागांचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. तर विरोधी पक्ष एसडीएफ फक्त १ जागा घेऊन पिछाडीवर असल्याचे दिसते. सिक्कीमबद्दल बोलायचे झाले तर तेथेही एसकेएम २९ जागांवर आघाडीवर आहे तर एसडीएफने फक्त एका जागेवर खाते खोलले आहे.