अयोध्यानगरातून दुकानदाराची कार लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयोध्या नगरात राहणाऱ्या एका दुकानदाराच्या घरासमोरून पार्कींगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक जगदीश खडके वय ४२ रा. आयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच ०२ सीडब्ल्यू ९०६) ही कार घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात यांनी ही कार चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Protected Content