भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुनिसीपल पार्क येथे दुकान खाली करण्याच्या एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करून दमदाटी व जीवेठार मारण्याची धमकी केल्याची घटना ६ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील संजय सुरेशचंद्र सुराणा वय ५९ रा. भुसावळ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे मुनिसीपल पार्क येथे सेंट्रल सर्कीट सीने असोसिएशन कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे ६ मे रोजी दुपारी ४ वाजता दुकानावर बसलेले असतांनपा ॲड. दिलीप भालचंद्र पंडीत, इकबाल बुध्दू गवळी, सईद कालू गवळी, हसीना सईद गवळी, गंगूबाई कालू गवळी, जाफर कालू गवळी, जुबेदा जाफर गावळी, अफजल कालू गवळी, बानो अफजल गावळी सर्व रा. भुसावळ यांनी दुकान खाली करण्याचे सांगून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.