जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शोलिनो बिल्डर प्रायव्हेट कंपनीच्या दुकानातून ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा सामानांची चोरी केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मनिष राजाराम पाटील वय ४७ रा. भोईट नगर, जळगाव यांचे नुतन मराठा महाविद्यालयासमोर शेलिनो बिल्डकॉन प्रायव्हेट लिमीटेलच्या नावाने दुकान आहे. १८ ते १९ डिसेंबर रोजी त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्याने कार्यालयाचे शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानातून कॉम्प्यूटर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि ५८ हजार ५०० हजार रूपयांची रोकड असा एकुण ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. हा प्रकार १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे हे करीत आहे.