चाळीसगाव (प्रतिनिधी) नजरचुकीने आपल्या दुचाकीसोबत सात ग्रॅम सोने आणि ८ हजाराची रोकड असलेली पर्स प्रामाणिकपणे केली परत केल्याची घटना आज चाळीसगावात घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, दीपक भगवान कोळी हे सपत्नीक शहरातील न्यू टिप टॉप दुकानवर कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदीझाल्यानंतर दुकान बाहेर आल्यावर त्यांच्या पत्नीकडून आपली पर्स दुसऱ्या दुचाकीला लावली गेली. ही दुचाकी विजया आनंदा गवळी यांची होती. त्यामुळे पर्स नजर चुकीने गवळी यांच्याकडे गेली. परंतु ही बाब दीपक कोळी यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड साहेब, पो.हे.कॉ.गोपाल बेलदार व पो.हे.कॉ. राहुल गुंजाळ, न्यू टीप टॉप दुकानाचे संचालक केतन बुंदेलखंडी यांच्या सहकार्याने ती पर्स दीपक भगवान कोळी (जामदा) यांच्या ताब्यात दिली. याबद्दल दीपक भगवान कोळी यांचे कौतुक होत आहे.