जळगाव, प्रतिनिधी |आज महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती ८ सदस्य निवड तर महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन करण्यात आले.
स्थायी समितीच्या ८ सदस्यांची मुदत १ ऑक्टोबर रोजी संपत असून त्यांना निवृत्त करण्यात येणार आहे. त्यानंतर संख्याबळ नुसार नविन ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, उपायुक्त अजित मुठे , नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीचे ८ सदस्यांचा १ ऑक्टोबर रोजी १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांना १७ सप्टेंबर रोजीच्या सभेत चिट्ठी टाकून निवृत्त करण्यात आले. यात पक्षीय बलाबलानुसार भारतीय जनता पक्षाचे ५, शिवसेना २ व एम.आय.एम. १ सदस्याची नावे संबधित पक्षातर्फ महापौर भोळे यांच्याकडे बंद पाकिटात देण्यात आले. यात भारतीय जनता पक्षातर्फ स्थायी समितीसाठी नवनाथ दारकुंडे, मुकुंदा सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रतिभा देशमुख, रेश्मा काळे या पाच सदस्यांची नावे देण्यात आली. तर सेनेतर्फे नितीन लढ्ढा, नितीन बरडे यांची पुन्हा वर्णी लागली आहे. तर एम. आय. एम.च्या वतीने सैईदा युसुफ शेख यांचे नाव सुचविण्यात आले. ही नावे महापौर भोळे यांनी वाचून दाखविले.
स्थायी समितीतून निवृत्त सदस्य : भाजपा प्रतिभा पाटील, उज्वला बेंडाळे, जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा, नितीन बरडे, एम.आय.एम.चे बागवान रियाज अह्मेद अब्दुल करीम यांचा समावेश आहे.
९ सदस्य असलेल्या महिला व बालकल्याण समितीचे मुदत १० ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे. यामुळे महिला व बालकल्याण समितीची देखील आज पुनर्गठन करण्यात आले आहे. यात पक्षीय बलाबलानुसार ७ सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे तर २ सदस्य हे शिवसनेचे आहेत. महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपच्या वतीने कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, मीना सपकाळे, शोभा बारी, चेतना चौधरी, हसिनाबी शरीफ शेख,मीनाक्षी पाटील तर शिवसेनेतून शाबनिबी सादिक व जिजाबाई भापसे या सदस्यांची नावे देण्यात आली होती ती नावे महापौर भोळे यांनी वाचून दाखविली.