भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला सुमारे ३० लाख रुपये किमतीचा डंपर आणि त्यातील सात ब्रास वाळू चोरट्यांनी पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त केलेला (एमएच १५ एचडब्ल्यू ८६९९) क्रमांकाचा निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा १२ टायर डंपर महसूल विभागाने भडगाव तहसील आवाराबाहेर, महाले कोल्ड्रिंक्सच्या शेजारील सार्वजनिक जागेवर लावला होता. या वाहनावर पहारा देण्यासाठी कोतवाल राजू थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, २४ जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास डंपर चालकाने चालकाने लावलेल्या जागेवरून डंपर पळवून नेला.

मोठा मुद्देमाल लंपास या चोरीच्या घटनेत ३० लाख रुपये किमतीचा डंपर आणि त्यामध्ये असलेली ३३ हजार रुपये किमतीची सात ब्रास वाळू, असा एकूण ३० लाख ३३ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलीस कारवाई या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी (कजगाव) चेतन गोविंद बैरागी यांनी भडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अशोक पाटील आणि रोहित पवार दोन्ही राहणार शिरपूर ता. धुळे यांच्यावर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. प्रदीप चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.



