पार्सल देण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षकाने केला तरूणीचा विनयभंग

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पार्सल देण्याच्या बहाण्याने सदनिकेत आलेल्या सोसायटीतील सुरक्षारक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत घडल. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली. विक्रम लक्ष्मण वाघ असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी कल्याणी नगर भागातील एका सोसायटीत दहाव्या मजल्यावर राहायला आहे. तरुणीने ऑनलाइन पद्धतीने काही वस्तू मागविल्या होत्या. या वस्तू देण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षक विक्रम वाघ सदनिकेत शिरला. तरुणीकडे पाहून त्याने अश्लील वर्तन केले. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाघला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे तपास करत आहेत.

Protected Content